गंभीर जखमी : माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखलराजुरा : राजुरा शहरात गुंडाराज वाढत असुन पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे शहरात वातावरण दूषित होत चालले आहे. राजुरा येथील पत्रकार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष बादल बेले यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना गुरूवारी घडली. या मारहाणीत बेले यांच्या डोक्यावर जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. बादल बेले हे येथील सोनियानगर आणि बेघर वस्तीमध्ये एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणाची चौकशी करण्यासाठी गेले होता. वॉर्डात जाऊन परत येत असताना कर्नल चौकात असलेल्या जमावाने अगोदर प्रकाश खडसे यांना मारहाण केली. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या बादल बेले यांना काठीने जबर मारहाण केली. त्यांनी बेले यांना मारहाण करीत रामनगर कॉलनीतील माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या घरापर्यंत गेले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोप तोडला, मोबाईल फोडून टाकले. बादल बेले यांच्या तक्रारीवरून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यासह मुरली सदाशिव मेहूरवार, संतोष सरदार, बुटले यांचा मुलगा आमित, गणेश आत्राम यांच्यावर भादंवि ३२४, १४३, १४७, १४९, १०९, १३५ अन्वये राजुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. (शहर प्रतिनिधी)पत्रकार संघाचा निषेधराजुरा तालुका पत्रकार संघाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला. मारेकऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली. निवेदन देताना पत्रकार आनंद भेंडे, बी.यू. बोर्डेवार, महिशर गुडेबिया, प्रवीण देशकर, सुरेश साळवे, रंगराव कुळसंगे, रूपेश चिडे, अमित जयपूरकर, मंगेश बोरकुटे, प्रा. सय्यद जाकीर, जमीर शेख, फारूख शेख, एजाज अहमद, उमेश मारशेटीवार, वामन पुररकर, दीपक शर्मा, क्रिष्णकुमार, मंगेश श्रीराम उपस्थित होते.भाजपाच्यावतीने राजुरा शहर बंदभारतीय जनता पक्षाच्यावतीने राजुरा शहर बंद करण्यात आले. बादल बेले याच्यावर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सतिश धोटे, राजु डोहे, सचिन डोहे, मधुकर नरड, डॉ. लखन अडबले, सुरेश रागीट, रूपेश चिडे, अमित जयपूरकर, लखन जाधव, अरुण मस्की यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
राजुऱ्यात पत्रकारावर हल्ला
By admin | Published: July 11, 2015 1:50 AM