शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

कोळसा खाणीत प्रदूषण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 9:27 PM

राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देकामगारांचे आरोग्य धोक्यात : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने हे प्रदूषण जीवघेणे ठरत आहे.वेकोलिच्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी २, गोवरी डीप खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणीत नियमांना डावलून धूळप्रदूषण केले जाते. दिवसरात्र मोठ्या प्रमाणात खाणीत धूळ उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलि प्रशासन वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमविते. परंतु कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वेकोलि घेत नाही. हे कामगारांचे दुदैव आहे. कामगारांच्या सुरक्षिततेचा वेकोलित मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जातो. परंतु हा कामगाराप्रति वेकोलि प्रशासनाने दाखविलेला केवळ देखावा आहे. वेकोलि परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने परिसरातील रस्ते धुळीने माखले आहे. एखादा ट्रक जवळून गेला तर रस्त्यावरील समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता असते. धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वेकोलि प्रशासनाची आहे. परंतु वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलि प्रशासन कामगारांच्या जिवाशी खेळ करीत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेकोलित उडणारी धूळ का दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेकोलितून उडणाºया धुळीने कोळसा खाण परिसरातील शेती पूर्णत: काळवंडली आहे. कोळशाच्या उडणाºया धुळीने अनेकांचे नुकसान होत असताना धूळ प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. केवळ जबाबदारी झटकून चालणार नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळालाही आपले चोख कर्तव्य बजावावे लागणार आहे.वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी धूळ प्रदूषणावर लक्ष दिले नाही तर नागरिकांचा अधिकाऱ्यांविरुद्ध उद्रेक होईल, हे निश्चित आहे. वेकोलितून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीने परिसरातील नागरिकही बेजार झाले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प का ?प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र धूळ प्रदूषणावरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण सुटत चालल्याने कारखान्यात मोठ्या प्रमाणात नियमाची एैसीतैसी केली जात आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले आहे.