गडचांदूर-कोरपना मुख्य रस्त्यालगत असलेल्या या रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार, गावातील शेतकरी तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. कोरपना तेलंगणातील आदिलाबाद याठिकाणी जाण्याकरिता नागरिकांना रस्ता हा सोयीचा असून पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्यात आली. परंतु निकृष्ट कामामुळे पुन्हा रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे. रस्ता खराब असल्याने जनावरांनाही शेतात जाण्यास अडचण निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना शेतात साहित्य ने-आण करण्यास चिखलाचा सामना करावा लागत आहे. राजूरगुडा, लालगुडा या दोन आदिवासीबहुल गावांना जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
नांदा लालगुडा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:18 AM