शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

कुख्यात हाजी गॅग पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: April 20, 2017 1:27 AM

एकीकडे चंद्रपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जिल्ह्यातील कुख्यात हाजी गॅग

आॅपरेशन आॅल आऊटदरम्यान कारवाई चंद्रपूर : एकीकडे चंद्रपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जिल्ह्यातील कुख्यात हाजी गॅग मंगळवारी रात्री मोठा गुन्हा करण्याची तयारी करण्यात व्यस्त होती. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी हॉटेलला घेराव घालून नऊ आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपीमध्ये हाजी शेख सरवर (३६) घुग्घुस, संतोष उर्फ विक्की दुसाने (२४) गडचांदूर, जयवंत पाईकराव (२८) घुग्घुस, आनंद कांबले (२४) दुर्गापुर, अक्षय कुंटलवार (२२) घुग्घुस, शेख गौस बाबा (१८) घुग्घुस, मोहम्मद शादाब (२६) बल्लारपूर, सलमान उर्फ राज सलीम खान (२३) बल्लारपूर व मोहम्मद वखार हबीब शेख (२३) चंद्रपूर यांचा समावेश आहे. चंद्रपुरात मनपा निवडणूक असल्यामुळे मंगळवारला रात्री आॅपरेशन आॅलआऊट मोहिम राबविण्यात येत होती. रात्री एक वाजताच्या दरम्यान शहर पोलिसांना एका हॉटेलमध्ये गुंड प्रवृत्तीचे ८ ते ९ जण असल्याची माहिती मिळाली. यांची तपासनी करण्यासाठी शहर पोलिसांची एक तुकडी हॉटेलमध्ये गेली. कोणाला काही कडण्याच्या आत पोलिसांनी बालाजी वॉर्डातील रिशा हॉटेलला घेराव घातला. आणि हॉटेलच्या रुम नंबर ३०६ चा दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडल्याबरोबर पोलिसांनी सर्च मोहीम सुरु केली. त्यावेळी आतील सर्वजण पळ काढण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र पोलिसांनी संपूर्ण हॉटेलला घेराव घातला असल्यामुळे ते अपयशी ठरले. यावेळी पोलिसांसोबत हॉटेलमधील युवकांशी झटापट झाली. त्यामध्ये तीन पोलीस जखमी झाले.त्यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी एक धारधार खंजर, चाकू, एक दोर, मिरची पावडर, बिअरच्या दोन बाटला आदी सामान जप्त केले. (नगर प्रतिनिधी) ंं अटक केलेल्या आरोपींवर असलेले गुन्हे शेख हाजीवर यापूर्वी शहर पोलीस स्टेशनमध्ये तीन, घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये दहा, भद्रावतीमध्ये एक, गडचांदूरमध्ये एक, आरोपी संतोष दुसाने वर गडचांदुरमध्ये तीन व टेकामांडवामध्ये एक, जयवंत पाईकवारवर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एक, आनंद कांबळेवर दुर्गापुरमध्ये एक, मोहम्मद शादाबवर बल्लारपुरमध्ये एक, भद्रावतीमध्ये एक, सलमान खानवर बल्लारपुरमध्ये एक, रामनगर पोलीस ठाण्यात एक तर मोहम्मद वखारवर रामगनर पोलीस ठाण्यात एक गुन्ह्याची नोंद आहे.