चंद्रपूर : येथील वरोरा नाका उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यास लहान मुलांचा हात सहज पोहचू शकतो, एवढ्या अंतरावर आहेत. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपूर येथील वरोरा नाका परिसर नेहमीच गजबजलेला असतो. उड्डाणपुलाच्या खालील बाजूस अनेकांनी छोटी-मोठी दुकाने टाकली आहेत. उड्डाणपुलाच्या खालील बाजूस विद्युत वाहिनींच्यास तारा झुकल्या असून लोंबकळत आहेत. जमिनीपासून चार ते पाच फूट अंतरावर तारा आल्या आहेत. त्यामुळे छोट्या मुलाचा हात लागून अपघात होण्याची शक्यता आहे. याच्याच बाजूला खानावळ, खासगी रुग्णालय, अनेक खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे येथेे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.