शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:00 PM

शहरातील अनेक रस्त्यांचे डांबर व सिमेंट उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. रत्नमाला चौक ते उड्डान पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने एमएच ३४ बीके १८१७ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात होवून एक युवक गंभीर जखमी झाला़ वणी मार्गावरील टोल टॅक्ससमोरी १०० फुटाच्या अंतरावरही तीन फुटांचा खड्डा असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : दुरुस्ती करण्याची मागणी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील अनेक रस्त्यांचे डांबर व सिमेंट उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. रत्नमाला चौक ते उड्डान पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने एमएच ३४ बीके १८१७ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात होवून एक युवक गंभीर जखमी झाला़ वणी मार्गावरील टोल टॅक्ससमोरी १०० फुटाच्या अंतरावरही तीन फुटांचा खड्डा असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़वरोरा शहरातील वर्दळीने गजबजलेल्या आझाद वॉर्डातील नालीवरसिमेंट रपटा तयार करण्यात आला़ यावरील उघड्या पडून दोन फुटांचा खड्डा तिथे तयार झाल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक जीव धोक्यात ठेवून पुढे जात आहेत़ शहरातील प्रमुख रस्त्यांची अशी गंभीर अवस्था असूनही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही़ झोपडपट्टी वसाहतीतील रस्त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ अतिवृष्टीमुळे वरोरा शहरातील अनेक रस्त्यांची अशी दैना झाली़ बांधकामासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले़ हा सर्व खर्च पहिल्या पाण्यातच वाया गेल्याची टीका नागरिक करीत आहेत़ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर मोठा अपघात होण्याचा धोका वर्तविला जात आहे़