यावेळी मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, डॉ. जनबंधू, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ. जयश्री वाडे, डॉ. गाडगे, डॉ. लाहेरी, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा उपस्थित होते.
म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यात करण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मनपा नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करून आशा वर्करकडून रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून मधुमेह रुग्णांची यादी उपलब्ध आहे. १ एप्रिलपासून जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. अशांची रक्त तपासणी आरोग्य चमूच्या माध्यमातून घरोघरी जाऊन करण्यात येईल. नागरी आरोग्य केंद्रात कान, नाक, घसा व मुख शल्य चिकित्सकांकडून म्युकरमायकोसिसची तपासणी करणे सुरू आहे. यावेळी कोरोना चाचणी केंद्र आणि लसीकरण केंद्रांचाही आढावा घेण्यात आला.
कोट
ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह असलेल्या कोरोनामुक्त रूग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लागण होऊ शकते. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास जोखीम कमी होऊ शकते. कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य विभागाद्वारे टेलिफोनद्वारे माहिती घेणे सुरू आहे. साखर नियंत्रणात ठेवण्याकरिता डिस्चार्ज रुग्णांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत,
-डॉ. आविष्कार खंडारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा चंद्रपूर