---
पाणीपुरवठा विभागाची स्थापना करावी
कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना व सिंचाई उपविभागाचे कार्यालय नाही. त्यामुळे येथील नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते. या कार्यालयावर राजुरासह कोरपना, जिवती तालुक्याचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे येथील वाढता व्याप लक्षात घेता कोरपना येथे दोन्ही विभागाचे स्वतंत्र उपविभाग स्थापन करावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
---
फोटो : सावरगाव फोटो
लोक विद्यालयात गणित दिवस
सावरगाव : दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारा संचालित नागभीड तालुक्यातील लोक विद्यालय तळोधी (बा.) येथे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक आरती विधाते यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक ए. वाय.बांगरे, सहाय्यक शिक्षक आर.एम. निनावे, डी.आर.रेहपांडे, ए.एन.कोहळे, पी.बी.पाकमोडे, एस.बी.बालमवार, एस. बी.उंबरकर, श्री सगळाम, के.वाय.
नागपूरकर, एस.व्हि.घोडे तथा संपूर्ण शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. संचालन सहाय्यक शिक्षक एम.व्ही.टोंगे, तर आभार सहाय्यक शिक्षक संतोष नन्नावार यांनी मानले.
कोट लिडच्या बातमीसाठी
अपघात टाळण्यासाठी हेल्मेट तसेच
दुचाकीला दोन्ही बाजूने आरसे असणे गरजेचे आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. हेल्मेट आणि दुचाकीला आरसे लावण्यासंदर्भात लवकरच मोहीम आरंभण्यात येणार आहे.
हृदयनाश यादव
वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर