बल्लारपूर शहरात पिस्तूल बाळगणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी बल्लारपूर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहे. रविवारी सायंकाळी नरेश मेश्राम या युवकाने चक्क पिस्तूल हातात घेऊन फेसबुक व व्हाॅट्सॲपवर पोस्ट टाकली. या पोस्टने बल्लारपूर पोलीस खळबडून जागे झाले. त्या युवकाला ठाण्यात बोलावून त्याची झाडाझडती घेतली असता ती पिस्तुले नकली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुले ताब्यात घेतली. त्याला चांगलीच समज देऊन सोडून देण्यात आले. त्याने ती पिस्तुले ऑनलाइन मागविल्याचे पोलिसांना सांगितले. ही बाब पोलिसांसाठी नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
नकली पिस्तूल दाखवून लुटल्याची घटना
अलीकडेच दोन युवक पाॅवर हाउसच्या रस्त्याने हातात पिस्तूल घेऊन जात असल्याची माहिती राजुरा पोलिसांनी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना दिली. पोलिसांनी लगेच त्या युवकांचा शोध घेतला. ते घटनास्थळी गांजा ओढत बसले होते. त्यांच्याकडेही नकली पिस्तूल पोलिसांना आढळली. दुसऱ्या एका घटनेमध्येही एका युवकाकडून नकली पिस्तूल जप्त करण्यात आली. अलीकडे निर्भय पेट्रोलपंपावर पिस्तूल दाखवून पैसे लुटणाऱ्यांकडेही नकली पिस्तूल होती.
कोट
अलीकडे युवकवर्ग नकली पिस्तूल ऑनलाइन खरेदी करीत आहे. त्यांचा हेतू गुन्हे करण्याचा नसला तरी शहरात गुन्हे करणाऱ्यांकडे नकली पिस्तूल मिळाल्यामुळे अशा बाबीवर पालकवर्गाने आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर
260721\20210726_133316.jpg
पिस्टल