चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आरक्षणासाठी आवश्यक आकडेवारी व माहिती पुरवण्यात आलेली नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यात मुंबईसह काही महानगर पालिका निवडणूक तसेच पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. शुक्रवारी जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली.
यावेळी जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मनीषा बोबडे, अक्षय येरगुडे, आकाश लोडे, नामदेव पिपरे, इमदाद शेख, सचिन पिंपळशेंडे, चंदू झाडे, प्रवीण मटाले, गीतेश शेंडे, अमोल घोडमारे, सतीश येसांबरे, कांचन चिंचेकर, ज्योती कांबळे, सुनीता रामटेके, रश्मी नगराळे, रेश्मा शेख, रमा अलोणे, पुजा रामटेके, सुमित्रा थोरात, कविता सागौरे, सपना दुर्गे आदी उपस्थित होते.