आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मंदिरावर १८ मार्च ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत यात्रेदरम्यान मंदिराचा कारभार बघण्यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांनी एका आदेशान्वये निरीक्षकाची नियुक्ती केली होती. या नियुक्तीला श्री महाकाली देवस्थान चांदा ट्रस्टचे सुनील महाकाले यांनी आव्हान दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने या आदेशावर २६ मार्चपर्यंत स्थगनादेश दिला आहे.१८ मार्च ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीपर्यंत निरीक्षकाला संपूर्ण देखरेखीचे आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिले होते. यानुसार १८ मार्च रोजी निरीक्षकांनी स्वत: मंदिरात जावून दानपेट्या सील केल्या. रक्कम मोजून ती ट्रस्टीद्वारे मंदिराच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्या दानपेट्यांचे पुन्हा पंचनामे करून त्यावर निरीक्षकाची स्वाक्षरी व शिक्के मारून बंद केल्या होत्या. ४ ते १४ एप्रिल २०१८ च्या दरम्यान त्या दानपेट्यांचे पंचनामे करून उघडण्यात येणार होत्या. त्यातील रक्कम ट्रस्टीमार्फत मंदिराच्या बँक खात्यात जमा करायची होती. या आदेशाला सुनील महाकाले यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. यानुसार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिला आहे. २६ मार्च रोजी या स्थगनादेशावर सुनावणी होणार आहे. यामध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी बाजू मांडल्यानंतर तो स्थगनादेश कायम राहील वा नाही, याचा निर्णय होणार आहे. स्थगनादेशानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी मंदिराच्या कारभाराच्या चौकशीचे दिलेले आदेश मात्र कायम असल्याचे निरीक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाकाली मंदिरातील निरीक्षक नियुक्तीला स्थगनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:27 PM
चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मंदिरावर १८ मार्च ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत यात्रेदरम्यान मंदिराचा कारभार बघण्यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांनी एका आदेशान्वये निरीक्षकाची नियुक्ती केली होती.
ठळक मुद्देहायकोर्ट : मंदिरातील व्यवहाराची चौकशी होणार