शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

दारिद्र्याने हतबल मुलांचे

By admin | Published: November 14, 2016 12:52 AM

गरिबीने हतबल झालेल्या व समाजाने नाकारलेल्या असंख्य चिमुकल्या निरपराध बालकांना खेळण्या-बागळण्याच्या...

आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमेजले !हाती भिक्षेचा कटोरा : चिमुकल्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरणार कोण?प्रकाश काळे गोवरीगरिबीने हतबल झालेल्या व समाजाने नाकारलेल्या असंख्य चिमुकल्या निरपराध बालकांना खेळण्या-बागळण्याच्या वयात रस्त्यावर, रेल्वे फलाटावर, बसस्थानकावर हाती भिकेचा कटोरा घेऊन त्यांच्यावर भीक मागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक निरागस बालकांचे बालपण फुलविण्याच्या वयात त्यांच्या आयुष्याचे मातेरे झाले आहे.शाळा गळती झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयाचा खर्च करते. समाजातील कोणताही बालक अन् बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असा त्या माग उद्देश्य आहे. मात्र गरिबीचा प्रचंड विळखा पडलेल्या निरागस बालकांसाठी शिक्षण तर दूरच. परंतु दोन वेळेचा सांजेची भाकर मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. बालकदिनी गरिबांच्या मुलांसोबत सेल्फी काढणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात मायेचा पदर धरून कामावर जाणाऱ्या निरागस बालकाच्या आईला बोलते केले असता, ती माऊली म्हणाली की, आम्हाला दोन वेळेच्या सांजेची भाकर मिळत नाही. मजुरी मिळाली तर बरं, नाहीतर उपाशीच झोपून रात्र काढावी लागते. तेव्हा तुकडाभर भाकरसुद्धा कोणी देत नाही. आभाळाखाली अख्य आयुष्यच घालविताना घरादारांचा कोणताही आधार नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडीत वणवण भटकंती करताना जागा मिळेल तिथे राहायच. मिळेल तर चार पैसे जमवायचे. सांजेला पोटाची सोय करायची आणि आयुष्य जगायचं. मग पोराच्या शिक्षणाचे काय, असं विचारताच ती म्हणाली की, आमाले शिक्सन-बिक्सन काई नको. इथं पोटाची भाकर मियत नाही, तिथं शिक्सनाचे काय, असा सवाल करीत तिने डोळ्याला पाणी आणले.जेथे दोन वेळेच्या पोटाचे वांदे आहेत, तिथे आईसोबत मजुरीसाठी पदर धरून जाणाऱ्या निरागस चिमुकल्यांचे बालपण परिस्थितीने गांजले आहे. मायेसोबत काम करायला गेले नाही तर उपाशीच झोपावे लागणार. मग पोट महत्त्वाचे की शिक्षण, हा एकच प्रश्न मनाला विचार करायला लावणारा आहे. एकीकडे एबीसीडी म्हणून नियमित इंग्रजी शाळेत जाणारी मुले तर दुसरीकडे परिस्थितीमुळे शिक्षणाचा जराही गंध नसलेली निरागस बालके हॉटेल, पानटपरीवर काम करताना दिसतात. खाचखडग्यातून वाट काढताना आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षमय जीवन जगणे त्यांच्या नशिबी कायमच असते. त्यांचे कोवळे बालपन कामावर हरवून जाते. फक्त त्यांना माहिती आहे दोन वेळेच्या पोटाचा सवाल.आज बालकदिनभारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस बालकदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र शिकण्याच्या कोवळ्या वयात या बालकांच्या हाती दुर्दैवाने पाटीपुस्तकांऐवजी भिकेचा कटोरा आला आहे. त्यामुळे आयुष्य घडविण्याच्या वयात त्यांचे आयुष्यच करपून गेले आहे. त्यांच्यासाठी बालकदिनाचे महत्त्व नाही.