लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या गोवरी कोळसा खाण अंतर्गत दररोज होणाºया ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. अशातच गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे गोवरी येथील शिवाजी हायस्कूल शाळेची बोरवेल दोन फूट जमिनीखाली गेली. यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून शालेय प्रशासन हादरले आहे.बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाºया गोवरी कोळसा खाणीत दररोज दुपारी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंग केली जाते. ब्लास्टिंगची तीव्रता भयानक असल्याने अल्पावधीतच येथील घरांना तडे गेले आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा वेकोलिकडे तक्रारी केल्या. मात्र वेकोलि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे समस्या अजुनही जैसे-थे आहे.गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या ब्लास्टिंगने शिवाजी हायस्कूल शाळेचे हातपंप चक्क दोन फूट खोल जमिनीखाली दबल्या गेले. शिवाय त्यातून पाणीही बंद झाले. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्लास्टिंगमुळे शाळेच्या इमारतीलाही तडे गेले आहेत. याबाबत आमदार अॅड. संजय धोटे यांनी सभागृहात प्रश्न मांडला होता. तेव्हा शासनाने चौकशी लावली होती. शाळेच्या इमारतीची पाहणी केली व गावातील नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर काहीच उपाययोजना झाल्या नाही.वेकोलिच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त असून ब्लास्टिंगची तीव्रता वाढविल्याने वारंवार असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ब्लास्टिंगची तीव्रता कमी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी, नागरिकांनी केली आहे.ब्लास्टिंगचा जीवाला धोकावेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लास्टिंगने गावकरी व विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शक्तीशाली ब्लास्टिंगने घरे पडून जीवघेण्या घटना यापूर्वी घडल्या आहे. त्यामुळे आजच्या घटनेने गावकरी व शालेय प्रशासन हादरले आहे.
शक्तिशाली ब्लास्टिंगने हातपंप दोन फूट जमिनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:42 AM
बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या गोवरी कोळसा खाण अंतर्गत दररोज होणाºया ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. अशातच गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे गोवरी येथील शिवाजी हायस्कूल शाळेची बोरवेल दोन फूट जमिनीखाली गेली.
ठळक मुद्देगोवरी येथील घटना : शाळा प्रशासन हादरले, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका