लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने शहरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यशस्वी अंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील ३० हजार ४६ मातांनी योजनेचा लाभ घेतला. योजनेतंर्गत ११ कोटी ३८ लाख ७० हजारांचा लाभ देण्यात आला आहे.भारतामध्ये दर तीन स्त्रियांमध्ये एक स्त्री कुपोषित आहे. कुपोषणामुळे अशा मातांची बालके कमी वजनाची असतात. बालकाचे कुपोषण मातेच्या गर्भाशयातच सुरू होते. याचा अनिष्ट परिणाम एकूणच जीवन चक्रावर होतो. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून आर्थिक व सामाजिक ताण तणाव कमी केल्या जाते. काही महिला गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत घरची कामे करीत असतात. बाळ जन्मानंतर त्या लगेच कामाला लागतात. अशावेळी त्यांच्या शरीराची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे शारीरिक क्षमता पूर्वपदावर येण्यासाठी अडचणी निर्माण होतात. बाळाच्या पहिल्या सहा महिन्यात स्तनपान करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ४६ मातांनी योजनेचा लाभ घेतला. ११ कोटी ३८ लाख ७० हजारांचा निधी वाटप करण्यात आला.योजनेचा मुख्य उद्देश प्रसुतीच्या अगोदर व प्रसुतीनंतर पहिल्या जीवंत बाळाकरिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरीचा लाभ व्हा हा आहे. आर्थिक मोबदला दिल्यामुळे गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्य सेवांचा लाभ घेण्याकडे कल वाढ ला. माता मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यास ही योजना परिणामकारक ठरली. गरोदर व स्तनदा मातांना रोख पाच हजार तीन हप्त्यात दिला जातो. पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांत गरोदरपणाची तारीख नोंदणी केल्यानंतर एक हजार, दुसरा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दोन हजार व तिसरा हप्ता प्रसुतीनंतर अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, हिपॅटायटीस बी व लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर दोन हजार रूपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.आरोग्यदायी राष्ट्रीय उभारणी - डॉ. राजकुमार गहलोतप्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत जागृती सप्ताहानिमित्त शासनाने ‘आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी, सुरक्षित जननी विकसित धारणी’ या घोषवाक्याचा जिल्ह्यात प्रचार केला जात आहे. २ ते ८ डिसेंबर या कालावधीत सदर योजनेची माहिती विविध माध्यमांद्वारे ग्रामीण, आदिवासी भागात पोहोचविल्या जात आहे. ग्रामसभा, मॅरेथॉन, प्रभात फेरी, माहिती पत्रके वाटून तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजना लाभार्थ्यांची नोंदणी पोस्ट व आधार कॅम्प शिबिर आयोजित केल्या जाणार आहे. माता व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आरोग्य योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी केले आहे.
मातांसाठी जीवनदायिनी ठरली ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:00 AM
बाळाच्या पहिल्या सहा महिन्यात स्तनपान करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ४६ मातांनी योजनेचा लाभ घेतला. ११ कोटी ३८ लाख ७० हजारांचा निधी वाटप करण्यात आला. योजनेचा मुख्य उद्देश प्रसुतीच्या अगोदर व प्रसुतीनंतर पहिल्या जीवंत बाळाकरिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरीचा लाभ व्हा हा आहे.
ठळक मुद्दे३० हजार मातांना लाभ : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची अंमलबजावणी