शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पीआरसीकडून होणार ‘त्या’ दोन अहवालांची तपासणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 5:00 AM

मंगळवारी जिल्ह्यात आगमन होणाऱ्या पंचायत राज समितीचे प्रमुख आ. संजय रायमुलकर हे आहेत. या समितीत २९ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, समितीसोबत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव, अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, समिती प्रमुखांचे स्वीय सहायक, चार कर्मचारी, चार प्रतिवेदक, अशा एकूण १३ व्यक्तींचा सहभाग राहणार आहे. ९ ते ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही समिती जिल्हास्थळी मुक्कामी असेल.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अहवाल वर्षातील तत्कालीन अधिकाऱ्यांचीही नोंदविणार साक्ष

राजेश मडावी लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि वार्षिक प्रशासन अहवाल हा  स्वराज्य संस्थांचा कारभार कसा चालतो, याचा आरसा असतो. शासनाकडून मिळालेला निधी व प्रत्यक्ष योजनांवर झालेला खर्च नियमानुसार आहे की नाही, याचे प्रतिबिंब या दोन अहवालात उमटते. त्यामुळे मंगळवार (दि. ९) पासून जिल्ह्यात तीन दिवस मुक्कामी असणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीने या दोन अहवालांबाबत प्रश्नांची सरबत्ती करणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे, अहवाल वर्षातील संबंधित तत्कालीन सर्व अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे या उलटतपासणीने काही अधिकारी धास्तावल्याची चर्चा आहे.   मंगळवारी जिल्ह्यात आगमन होणाऱ्या पंचायत राज समितीचे प्रमुख आ. संजय रायमुलकर हे आहेत. या समितीत २९ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, समितीसोबत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव, अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, समिती प्रमुखांचे स्वीय सहायक, चार कर्मचारी, चार प्रतिवेदक, अशा एकूण १३ व्यक्तींचा सहभाग राहणार आहे. ९ ते ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही समिती जिल्हास्थळी मुक्कामी असेल. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सहा आमदारांशी ही समिती अनौपचारिक चर्चा करणार असल्याचे समजते. सकाळी ११ वाजता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी विश्रामगृहात चर्चा करणार आहे. त्यानंतर समितीचे आगमन जि. प. सभागृहात होणार आहे. चंद्रपूर जि.प.च्या सन २०१०-२०११ ते सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील संबंधित परिच्छेदांबाबत मुख्य कार्यकाऱ्यांची साक्ष नोंदविणार आहेत. बुधवारी पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून साक्ष नोंदविणार आहे. शेवटच्या दिवशी सन २०११-२०१२ ते सन २०१७- १८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालाबाबतही साक्ष नोंदवून घेणार आहे. २०१० ते २०१८ या वर्षावर जास्त फोकसचंद्रपूर जि.प.च्या सन २०१०-२०११ ते सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०११-२०१२ ते सन २०१७- १८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालावर या समितीचा जास्त फोकस असल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या वर्षाशी संबंधित चंद्रपूर जिल्हा परिषदेत कार्यरत तत्कालीन संबंधित सर्व अधिकाऱ्यांनाही बैठकीत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषद