दशेरीची करावी लागणार प्रतीक्षा
बल्लारपूर : मे आणि जून हे दोन महिने आंब्याचा रस खाणाऱ्या शौकिनांसाठी खास मेजवानीच असते. परंतु कोरोनाच्या संकटाने लग्नघटिका थांबल्यामुळे पाहुणचारावर निर्बंध आला असला तरी बल्लारपुरात आंब्याची आवक वाढली असून खवय्यांनी बेंगलोरच्या आंब्यांना पसंती दिली आहे. परंतु दशेरी आंब्याची प्रतीक्षा आणखी १० दिवस लागणार आहे.
सध्या महाराष्ट्रातील गरिबांचा आवडता आंबा ३० रुपये किलो दराने मिळत असल्याने या आंब्याचा खप वाढला आहे.
उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतो. संध्या आंबा बाहेर जाणे बंद असल्यामुळे बाजारात गावरान आंब्याची आवक वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी प्रत्येक दुकानात ३० ते ६० रुपये या दरात आंबे उपलब्ध आहे. शेख जावेद फ्रुटवाला यांनी सांगितले की भारतात आंब्याच्या एक हजारच्या वर प्रजाती असल्या तरी १५ ते २० प्रजातीचे आंबे बाजारात येतात. परंतु बेंगलोर येथून येणाऱ्या दिलखुश, हिमायत, दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्र प्रदेशातील बैगनपल्ली, आंब्याची आवक जास्त आहे. उत्तर प्रदेशातील दशेरी, लंगडा, चौसा हा आंबा नागरिकांच्या आवडीचा आहे. तो दहा दिवसानंतर येणार. परंतु संध्या शहरात हापूस व लालबाग हा आंबा स्वस्त असल्यामुळे याचा खप वाढला आहे.
कोट
आरोग्याला लाभदायक
विविध प्रकारचे आंबे चवीला जितके मधुर असतात तितकेच आरोग्यालाही लाभदायक असतात. आंब्यात ए, बी, सी ही जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात. तर व्हिटॅमिन ए, लोह, कॉपर आणि पोटॅशियम यासारखे पोषक घटकही आंब्यात असतात व भरपूर फायबरही आंब्यातून मिळते.
-डॉ. युवराज भसारकर, बल्लारपूर.