-------
बॉक्स
गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी
गर्भवती अवस्थेत स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीविरुद्ध लढायची कमी क्षमता असते. त्यामुळे गर्भवती महिलांना कोरोना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. लस घेतल्यानंतर इतरांना जसे छोटे-मोठे परिणाम जाणवतात तसेच गरोदर मातांनाही जाणवू शकतात. गर्भवती महिलांनी ताणतणाव घेणे टाळावे. आरामात राहावे, जेणेकरुन तुमचे मन शांत राहील. गर्भधारणा शेवटच्या टप्प्यावर असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी.
कोट
गर्भवती महिलांना लस घेण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. लस ही सुरक्षित आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी न घाबरता लस घ्यावी. लस घेतल्यानंतर इतरांना जसे हात दुखणे, अंगदुखी, हलकासा ताप यासारखी लक्षणे जाणवू लागली. तसेच गर्भवती महिलांनासुद्धा जाणवण्याची शक्यता आहे. परंतु, जास्तच दिवस ताप किंवा इतर लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. प्रिती बांबोळे, सहाय्यक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुती विभाग, मेडिकल कॉलेज, चंद्रपूर
--------
आरोग्य विभागाने गर्भवती महिलांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी कोणताही गैरसमज न बाळगता लस घ्यावी. दोन्ही लस या पूर्णपणे सुरक्षित आहे.
-डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर