लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक किल्ला पर्यटन जवळून पाहण्याची व इतिहास जाणून घेण्याची संधी चंद्रपूरकरांना मिळणार आहे. त्याकरिता इको-प्रो संस्थेच्या स्वयंसेवकाकडून ‘हेरिटेज वॉक’च्या मार्गाची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे.२१ आॅक्टोबरपासून प्रत्येक रविवारी सहा ते नऊ या वेळेत चंद्रपूरकरांना किल्ला पर्यटनाच्या रूपाने शहारातच अनोख्या किल्ला पर्यटनाची संधी मिळणार आहे. यात चंद्रपूर किल्ल्यावरून जवळपास दोन-तीन किलोमीटरचा ‘हेरिटेज वॉक’ सोबतच या किल्ल्याची संपूर्ण ऐतिहासिक माहिती, तसेच मागील 535 दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानाची माहिती, स्वच्छते पूर्वीची परिस्थिती व अभियानानंतर बदललेली स्थिती, अभियानातील अनेक अनुभव, इतिहासातील अनेक घडामोडी, गोंडकालीन स्थापत्य कला, ऐतिहासिक वास्तू निर्मितीमागची इतिहासातील गूढ गोष्टी आदीबाबत माहितीया किल्ल्यावरुन फेरफटका मारताना पर्यंटकांना देण्यात येणार आहे. सदर ‘हेरिटेज वॉक’ किल्ला पर्यटनाचा पादचारी मार्ग पावसाळ्यानंतर झाडी-झुडपे वाढल्याने ती काढणे आवश्यक होती. ती काढणे, रस्ता पर्यटन अनुकूल करणे याकरिता मागील १५ दिवसांपासून संस्थेची कार्यकर्ते झटत आहेत. यामध्ये इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, रवी गुरनुले, नितीन बुरडकर, जयेश बैनलवार, राजू काहिलकर, कपिल चौधरी, अमोल उत्तलवार, धर्मेद्र लुनावत, सचिन धोतरे, सुधीर देव, सुनील पाटील, नितीन रामटेके, मनीषा जैस्वाल, पूजा गहुकर, आयुषी मुल्लेवार, सारिका वाकुडकर आदी परिश्रम घेत आहेत.
इको-प्रोकडून हेरिटेज वॉकची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:32 PM
शहरातील ऐतिहासिक किल्ला पर्यटन जवळून पाहण्याची व इतिहास जाणून घेण्याची संधी चंद्रपूरकरांना मिळणार आहे. त्याकरिता इको-प्रो संस्थेच्या स्वयंसेवकाकडून ‘हेरिटेज वॉक’च्या मार्गाची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्देकिल्ला पर्यटन : ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी