वनप्रबोधनीत मुख्य सोहळा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाचंद्रपूर : राज्यात लावल्या जाणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. चंद्रपूर जिल्हयात २५ लाखांवर वृक्ष या दिवशी लावले जाणार आहेत. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी या कामाच्या तयारीचा बुधवारी आढावा घेतला आणि यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.जिल्ह्यात हजारो ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपन केले जाणार आहे. असे असले तरी वृक्षरोपणाचा जिल्हास्तरीय मुख्य सोहळा मूल मार्गावरील चंद्रपूर वनप्रबोधनीलगत कंम्पार्टमेंट क्रमांक ४०३ मध्ये होणार आहे. खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला सामाजिक वनीकरचे उपसंचालक काळे, उपवनसंरक्षक अरूण धाबेकर, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, मनोज जयस्वाल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने १५ लाख ५६ हजार रोपे लावली जाणार असून ही रोपे राखीव ठेवण्यात आली आहे. विविध शासकीय संस्था व खाजगी व्यक्तीव्दारे ५ लाख ७० हजार रोपे लावली जाणार आहेत. या रोपांच्या उचलचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. आजपर्यंत ५० टक्के रोपांची उचल झाली असून दर दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यातील विविध रोपवाटीकेतून रोपे घेऊन जात असल्याचे काळे यांनी सांगितले. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) वृक्षारोपण मोहिमेत जिल्ह्याचा मोठया प्रमाणावर सहभाग असणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात सर्वच रोप वाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावार रोपट्यांची व्यवस्था आहे. तेथून नागरिकांनी रोपटी घेवून जावीत आणि लावावीत. नागरिकांनी या कार्यात पुढे येण्याची गरज आहे. उद्दिष्ट व खाजगी व्यक्तींकडून झालेली मागणी या नुसार वृक्षारोपनासाठी झालेल्या खड्डयांचा आढावा घेतला आहे. - आशुतोष सलीलजिल्हाधिकारी, चंद्रपूर
वृक्ष लागवडीसाठी यंत्रणा सज्ज
By admin | Published: June 30, 2016 12:58 AM