लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात रोजगार हमीची विविध २५९ कामे सुरू असून या २५९ कामांवर पाच हजार ६०३ मजूर काम करीत असल्याची माहिती आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोजगार हमीच्या कामांची संख्या कमीच असल्याची माहिती आहे.नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्यात मोठेच नाही तर कोणतेच लहानसहान उद्योग नाहीत. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्ग दाखवत असलेल्या अवकृपेने या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना रोजगार हमीच्या कामांचा आधार घ्यावा लागत आहे.तालुक्यात धान उत्पादक शेतकरी जानेवारी महिन्यापर्यंत शेतीच्या कामात व्यस्त असतात. त्यानंतर मे महिन्यापर्यंत शेतीची कोणतीच कामे राहत नसल्याने आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना पसंती देतात.सद्यस्थितीत नागभीड तालुक्यात रोजगार हमीची २५९ कामे सुरू असल्याची माहिती आहे. यात वृक्ष लागवडची १४० कामे, तलाव खोलीकरणाची ३, बोडी खोलीकरणाची १, नहर खोलीकरणाची ८, विहिरीची ३, घरकुलाची ९१ कामे, अंगणवाडीची ५ आणि पांदण रस्त्यांच्या सहा कामांचा यात समावेश आहे. या २५९ कामांवर पाच हजार ६०३ मजूर काम करीत आहेत. प्रशासनाने आणखी कामे वाढवावीत अशी मागणी आहे.मिरची सातरेही आधारगेल्या काही वर्षात नागभीड तालुक्यात आंध्र प्रदेशातील मिरची व्यापाऱ्यांनी चांगलेच बस्तान मांडले आहे. या व्यापाºयांनी तालुक्यातील २० ते २५ गावात मिरची सातरे सुरू केले आहेत. मिरची साफ करण्याचे हे काम असून एका सातºयावर किमान २०० ते ३०० मजूर काम करीत आहेत. या मजुरांना या सातरा मालकांकडून मिरची उपलब्ध करून देण्यात येते. किलो किंवा बोरीप्रमाणे या मजुरांना मेहनताना मिळतो. तालुक्याचा विचार करता किमान ५ ते ६ हजार मजूर या मिरची सातºयावर काम करीत असावेत, असा अंदाज आहे.
रोजगार हमीच्या २५९ कामावर पाच हजार मजुरांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM
नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्यात मोठेच नाही तर कोणतेच लहानसहान उद्योग नाहीत. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्ग दाखवत असलेल्या अवकृपेने या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे.
ठळक मुद्देयंदा कामांची संख्या कमी : आणखी रोजगार उपलब्ध करावा