उत्पन्नात वाढ : विविध विभागांसाठी भरीव तरतूदचंद्रपूर : २०१७-१८ या वर्षांचा जिल्हा परिषदेचा ४३.३० कोटींचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. त्यानंतर नव्या जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड झाली. मात्र विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक अद्याप झालेली नाही. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प पदाधिकाऱ्यांविना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर करावे, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. तसे परिपत्रकही काढले होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर असून या वर्षीचा अर्थसंकल्पात तब्बल ७.८ कोटी एवढी विक्रमी वाढ दर्शवण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात विविध विकास कामासाठी ४३.३० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पाद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, अपंग व मागास संवर्गासाठीच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. जि.प. अर्थसंकल्पात विविध विकासाकडे आणि प्रशासनावरील खर्च यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्य कार्यकारी एम. डी. सिंह यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अशी आहे विभागनिहाय रक्कमअर्थसंकल्पात कृषी विभागासाठी ४.०५ कोटी, समाजकल्याण विभागासाठी ३.१३ कोटी, अपंग कल्याणासाठी २०१६-१७ व २०१७-१८ साठी ५.३१ कोटी, महिला व बालकल्याणसाठी २.०३ कोटी, लघुसिंचन विभागासाठी २.८१ कोटी, आरोग्य विभागासाठी १.३९ कोटी व शिक्षण विभागासाठी २.५४ कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचा ४३.३० कोटींचा अर्थसंकल्प सादर
By admin | Published: March 31, 2017 12:46 AM