लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्करी रोखण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिले.जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था संदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार निधीतून झालेल्या कामाचा आढावा घेत प्रलंबित असलेल्या कामाबाबत संबंधित विभागाला जाब विचारला. तर पुढील वर्षाच्या नियोजनामध्ये वेगवेगळ्या कामांची सूचना केली. जिल्हाभरातील कामांमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये खासदार निधीचा खर्च अधिकाधिक होईल, याकडे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश दिले.दुपारी सांसद आदर्श ग्राम बैठक झाली. या बैठकीमध्ये विकास कामांमध्ये येणाºया अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा व सिंचनाच्या संदर्भातील अडचणी दूर करावे. कृषी विभागाने बायोगॅस प्रकल्पाबाबत गतिशील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटांना शेळीपालन व शेडसाठी निधी उपलब्ध करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली. दारूबंदी करण्यासाठी महिला बचतगट व विविध संघटनांनी मोलाचे योगदान दिले होते. पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. पंरतु, अन्य राज्यातून तस्करी होवू शकते. त्यामुळे सीमावर्ती गावांतील नागरिकांचे सहकार्य घ्यावे, असेही ना. अहीर यांनी सांगितले. या बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त काकडे, नियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ उपस्थित होते.पीक कर्ज वाटपात बँकांनी गती आणावीजूनचा पहिला आठवडा सुरू झाला असतानादेखील खरिपासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज शेतकºयांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. हे अपयश बँकांचे आहे. त्यामुळे पुढच्या आठवडाभरात यासंदर्भातील प्रक्रियेमध्ये गती आणा, या शब्दात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, नियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवीद्र शिवदास, शिखर बॅकेचे एस.एन. झा यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आणि टंचाईचे नियोजन, विविध योजना व प्रधानमंत्री खनिज विकास निधीअंतर्गत येणारी योजनांसंदर्भात अंमलबजावणी कशी झाली, याचा आढावा घेण्यात आला.
सीमावर्ती राज्यातून दारूची तस्करी रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:18 AM
गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्करी रोखण्याचे निर्देश .......
ठळक मुद्देहंसराज अहीर : कायदा, सुव्यवस्थेचा आढावा