लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यू आजारग्रस्त तसेच संसर्गजन्य रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या आजारांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा सामान्य रूग्णालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. मोरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मुनघाटे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. एम. जे. खान, व अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. ना. अहीर म्हणाले, जिल्हा परिषदच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध आजारांची तीव्रता लक्षात घेवून ग्रामीण क्षेत्रामध्ये डेंग्यू तसेच अन्य आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या आरोग्याची स्थानिक स्तरावरील वैद्यकीय अधिकाºयांनी समन्वयातून उपाययोजना करावे. डेंग्यू व अन्य संसर्गजन्य आजाराने ग्रस्त रूग्णांसाठी आवश्यक औषधीसाठा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रूग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी अशा सुचनाही या बैठकीमध्ये केल्या. यावेळी भाजपा पदाधिकारी राजु घरोटे, मोहन चैधरी, विनोद गोंडे उपस्थित होती. बैठकीनंतर ना. अहीर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा सामान्य रूग्णालयात फेरफटका मारून आरोग्यविषयक व्यवस्थेची पाहणी केली. रूग्णालयात दाखल झालेले डेंग्यू रूग्ण तसेच अन्य रूग्णांशी औषधोपचाराबाबत चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या. रूग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता वरिष्ठांनी विशेष लक्ष घालावे, अशा सुचनाही त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाºयांना केल्या.
डेंग्यू संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:31 PM
जिल्ह्यात डेंग्यू आजारग्रस्त तसेच संसर्गजन्य रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या आजारांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा सामान्य रूग्णालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा सामान्य रूग्णालयात बैठक