शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेण्यास प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 5:00 AM

रुग्ण जवळच्या कोरोना केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल व इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. रुग्णांची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला आवश्यक सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धतेनुसार वेळीच उपचार केले जाणार आहे. गरज नसलेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरीच औषधोपचार केले जाणार आहे.

ठळक मुद्देरुग्णांची तयार होणार प्रतीक्षा यादी : केंद्रीय पद्धत अवलंबणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जो तो रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र प्रत्येकाला बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यातच वशिलेबाजी करून काहीजण बेड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत; त्यामुळे गरीब तसेच गरजू रुग्णांची हेळसांड होत आहे. यावर तोडगा म्हणून जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केले आहे. या माध्यमातून रुग्णांची नोंदणी तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार शासकीय तसेच खासगी रुग्णालयात बेड मिळवून देत उपचार केले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी फरफट थांबणार असून रुग्णांनाही आवश्यकता आणि गरजेनुसार उपचार केले जाणार आहे.रुग्ण जवळच्या कोरोना केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल व इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. रुग्णांची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला आवश्यक सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धतेनुसार वेळीच उपचार केले जाणार आहे. गरज नसलेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरीच औषधोपचार केले जाणार आहे.या पोर्टलच्या माध्यमातून रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोविड रुग्णालयात आय. सी. यू., व्हेंटिलेशन व ऑक्सिजन बेडच्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादीनुसार बेड उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोविड केअर सेंटर ठेवणार माहितीशहरातील कोविड रुग्णालयांना रुग्णांना परस्पर दाखल करता येणार नसून प्रथम रुग्णालयातील उपलब्ध रिक्त बेडची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरला द्यावी लागणार आहे. बेड रिक्त झाल्यावर संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष रुग्णाला माहिती देणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण थेट जाऊन उपचार घेऊ शकणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील गरजू रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध होणार आहे. बेड उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची हेळसांड काही प्रमाणात का होईना, थांबणार आहे. 

रेमडेसिविर इंजेक्शनचीही द्यावी    लागणार माहितीया पोर्टलमध्ये रुग्णालयाला दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहितीसुद्धा उपलब्ध राहणार आहे.  पोर्टलच्या पहिल्या पानावर कोविड हॉस्पिटल, डॉक्टर व त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती व मोबाईल क्रमांक  देण्यात येणार आहे. 

खोटे बोलणे रुग्णालय प्रशासनाच्या येणार अंगलटशहरातील काही कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असतानाही रुग्णांना उपलब्ध करून दिले जात नाहीत. अनेक वेळा फी भरल्याशिवाय बेड दिलेच जात नाहीत. त्यामुळे आता अशा रुग्णालयांवरही निर्बंध आले आहेत. रुग्णालयातील रिक्त जागेबाबत त्यांना प्रथम जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरला माहिती द्यावी लागणार आहे. या केंद्रातून येणाऱ्याच रुग्णाला दाखल करून घ्यावे लागणार आहे. 

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनरुग्णांना सुविधा होणाऱ्या या पोर्टलचे उद्घाटन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, महापालिका आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदी उपस्थित होते.

प्रथमच बेड अलाॅयमेट प्रणाली

रुग्णांना प्रतिक्षा यादीतील आपले स्थान कंट्रोल रूमच्या ०७१७२-२७४१६१ व ०७१७२-२७४१२ या क्रमांकावरून देखील माहिती करून घेता येणार आहे.  रूग्णांना वैयक्तिक नोंदणी करता येणार नाही. कोविड रूग्णांसाठी ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात आले आहे. रूग्णांना शासकीय व खाजगी कोविड रूग्णालयात अतिदक्षता, व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी याचा थेट लाभ होणार असून रूग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

अशी होणार नोंदणीप्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे रुग्णालय व बेड उपलब्ध  होणार आहे. नोंदणी करताना रुग्णाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी, आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक आहे. तसेच नोंदणी करताना एका मोबाईल क्रमांकावरून  चार रुग्णांची नोंदणी करता येऊ शकणार आहे. मोबाईल नसल्यास त्यांना इतरांच्या मोबाईलवरूनदेखील नोंदणी करता येणे शक्य होणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. सदर पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी नागपूर येथील लॉज त्रिमूर्ती  या संस्थेचे सहकार्य लाभले आहे

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल