चंद्रपूर : पूर्वी गूळ गरिबांचा तर साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते. मात्र दिवस बदलले आणि गुळातील गुणधर्मामुळे मागणी वाढली. त्यातच आरोग्याची अधिक काळजी असलेले शहरी भागातील नागरिक गुळाचा चहा पिणे स्टेटस समजू लागले. त्यामुळे मोठमोठ्या हाॅटेलमध्येही आता गुळाचा चहा मिळू लागला आहे. आरोग्यवर्धक असलेला गूळ आता साखरेपेक्षाही महाग झाला आहे.
साखर उद्योग अस्तित्वात यायच्या पूर्वी उस उत्पादक गुळाची निर्मिती करायचे. त्यामुळे मुबलक प्रमाणात गूळ मिळत होता. तर साखर फारच मोजक्या नागरिकांकडे रहायची. साखर घरी असली तर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. दरम्यान, साखर उद्योग मोठ्या प्रमाणात उभे राहिले आणि साखरेची मागणी वाढली. परिणामी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या गुळाची मागणी घटली. आता मात्र
आरोग्याच्या समस्या वाढत असल्यामुळे नागरिक पुन्हा गुळाकडे वळले आहे. विशेषत: शहरी भागामध्ये गुळाला अधिक मागणी आहे. गुळामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी -१२, व्हिटॅमिन बी- ६, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारखे पोषक घटक असते. गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते. तसेच चयापचनाची क्षमता वाढण्यासही मदत करते. त्यामुळे आता नागरिक पुन्हा गुळाकडे वळले आहे.
बाॅक्स
गुळाचा चहा बनले स्टेटस
पूर्वी गुळाचा चहा पिण्यासाठी नागरिक नाक मुरडत होते. मात्र आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे गुळाची मागणी वाढली आहे. एवढेच नाही तर नागरिक स्टेटससाठी घरी गुळाचा चहा पित असल्याचे दिसून येते.
गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करतात.
गुळामध्ये पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास उपयुक्त असलेल्या पोषण तत्त्वांचा साठा आहे. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. जेवणानंतर गुळाच्या छोट्या तुकड्याच नियमित सेवन केल्यास पचनसंस्थेच कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. औषधी गुणधर्मांमुळे अन्नपदार्थांचे पचन होते.
बाॅक्स
प्रकृतीसाठी गूळ चांगला
गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला लाभ मिळतात. नैसर्गिक स्वरूपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश नागरिक गूळ सेवन करतात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे नियमित वापर
केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदाच होता. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
शहरात गुळाला मागणी
आरोग्याची विशेष काळजी घेणाऱे नागरिक आता गुळाकडे वळले आहे. गुळातील पोषण गुणधर्मामुळे ते नियमित वापर करीत आहेत.त्यामुळे पूर्वीच्या तुलनेमध्ये सध्यास्थितीत गुळाची मागणी वाढली आहे.
बाॅक्स
गावात मात्र साखरच
ग्रामीण भागामध्ये शेती तसेच इतर कामधंदे करून नागरिक जीवन जगतात.
त्यामुळे स्टेटसच्या भानगडीच न पडता ते नियमित साखरेचाच चहा पीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आजही साखरेची मागणी अधिक आहे.