व्यवस्थापकीय संचालकांचे संघटनेला आश्वासन
चंद्रपूर :वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेने वारंवार निवेदन दिले आहे. दरम्यान, नुकतीच वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन नागपूर एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा वाढल्या आहे.
बैठकीला एफडीसीएमचे मुख्य महाव्यवस्थापक मुख्यालय ॰ीनिवास राव, यांच्यासह संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस रमेश बलैया, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, रवी रोटे, राहूल वाघ, अशोक तुंगीडवार, टी.एच. हरिणखेडे, विक्रम राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी वितरण केल्याबद्दल व्यवस्थापकीय संचालकांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सातवा वेतन लागू करावा, कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता द्यावा, नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता द्यावा, रिक्त पदे तत्काळ भरावी, सुधारिक शासन निर्णयाप्रमाणे एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांना वेतन॰ेणीचा लाभ देवून एकतर पदोन्नतीचा वनविभागाप्रमाणे लाभ द्यावा, कर्मचारी, वनमजूर सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारस अनुकंपाधारकांना आस्थापनावर घ्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सातवा वेतन लागू करण्याची कार्यवाही शासन स्तरावर प्रलंबित आहे. तत्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असून मंजुरी मिळताच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, तसेच इतरही मागण्या त्वरित सोडविण्यात येईल, याबाबत संचालक मंडळाच्या सभेत ठराव पारित करून कर्मचाऱ्यांना न्याय देवू असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेला दिले.