सिंदेवाही : शिक्षणाशिवाय आदिवासी समाजाला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने शिकले पाहिजे. ख-या आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी केवळ मोर्चे व आंदोलनांवर अवलंबून न राहता न्यायिक मार्गाने लढा दिला तर आदिवासींच्या समस्या सुटतील, असे प्रतिपादन लेखक व विचारवंत राजेंद्र मरसकोल्हे यांनी केले. आफ्रोट संघटना तालुका शाखेच्या वतीने मंगळवारील सिंदेवाही येथील आदिवासी प्रबोधन सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आफ्रोटचे जिल्हाध्यक्ष विजय कुंभरे तर प्रमुख पाहुणे आफ्रोट संघटनेचे संस्थापक सचिव नंदकिशोर कोडापे, महेंद्र उईके, सचिव शंकर मडावी, नागेंद्र कुमरे, सुरज मसराम, मंगलदास मेश्राम, सुनील पेंदाम, देवीदास मडावी, देवानंद मडावी उपस्थित होते.
मरसकोल्हे म्हणाले, १५ जून१९९५ च्या जीआर विरोधात लढा देण्यापासून केलेल्या न्यायिक लढा, त्यासाठी स्वतःवर अनेक बोगसांनी लावलेले आरोपयाला न जुमानता अविरतपणे ख-या आदिवासींच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची उमेद आफ्रोटमध्ये आजही आहे. ख-या आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी २०१४ पासून रस्यावर उतरलो आहाेत. सन्मान मागल्याने मिळत नाही तर त्यासाठी समाजहिताचे कार्य करावे लागते, असे मत सुनील उईके यांनी मांडले. सुनील पेंदाम, देवीदास मडावी , संस्थापक सचिव सन्मा.नंदकिशोर कोडापे यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष विजय कुंभरे यांनीही मार्गदर्शन केले..प्रास्ताविक तालुका शाखा अध्यक्ष राजू ताडाम, संचालन मूलनिवासी पुरुषबचत गटाचे सचिव गिरीधर गेडाम यांनी केले. आभार मिलींद कोवे यांनी मानले. आयाेजनासाठी निलकंठ धनबाते ,रमेश सिडाम, प्रमोद कोवे,रामभाऊ मेश्राम, अमरदिप गेडाम, डाॅ.कुलसंगे,विनोद कोवे, रवि आळे,घनश्याम पेंदाम,अरुण कुंभरे,नामदेव सुरपाम,मनोहर कुमरे,बालक्रिष्ण तलांडे,तेजराज गेडाम,दोडकू मेश्राम,दिनकर उईके, प्रकाश कोयताडे, दिवाकर मसराम, सचिन मरसकोल्हे, नेताजी सोयाम, दिपक म्हैसकर, विनोद उईके, अविन सिडाम, निलिमा मडावी, किरण कोवे, लता ताडाम आदींनी सहकार्य केले.