तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मक्का व उन्हाळी धानाची लागवड केलेली आहे. उत्पादित धानाची खरेदी अजूनपर्यंत सुरू केलेली नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवघ्या काही दिवसातच खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत व मजुरीवर खर्च करण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे; परंतु ऑनलाइन नोंदणी केलेल्या धानाची खरेदी सुरू केली नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडलेला आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार लक्षात घेऊन मक्का व उन्हाळी धानाची खरेदी प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी कवडू कुंदावार यांनी केलेली आहे.