शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

उत्पादन शुक्ल विभागाचे जिल्ह्यात छापे

By admin | Published: September 16, 2016 1:38 AM

जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीवर राज्य शुल्क विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबविल्या जात

चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीवर राज्य शुल्क विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबविल्या जात आहे. गेल्या काही दिवसात धडक कारवाईची तिसरी मोहिम नुकतीच राबविण्यात आली. या धाडसत्रात सात आरोपींना अटक करण्यात आली असून हातभट्टीसह देशी, विदेशी मद्य जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात मद्य विक्रीस पूर्णपणे बंदी आहे. असे असतानाही चोरट्या मार्गाने हातभट्टीसह देशी व विदेशी मद्य विकण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात उत्पादन शुल्क ठिकठिकाणी धाडसत्र राबवून कारवाई करीत आहे. गेल्या काही दिवसात यापूर्वी दोन मोठे धाडसत्र राबविण्यात आले होते. पाठोपाठ तिसरी मोठी मोहिम राबविण्यात आली. अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वात अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी केलेल्या कारवाईत चंद्रपूर येथे उत्पादन शुल्कच्या पथकासह यवतमाळ, नागपूर व भंडारा येथीलही पथके सहभागी झाले होते. या कारवाईत चंद्रपूर शहरात महाकाली कॉलनी, बाबुपेठ, जलनगर, रय्यतवारी कॉलनी, वडगाव वार्ड चंद्रपूर तसेच जुनोना, चिरोली, पळसगाव, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, राजुरा, वरुर व लक्कडकोट या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली तर १६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील ७ गुन्हे वारस व ९ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. यात एका दुचाकी वाहनासह ८७ हजाराचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याशिवाय ७१५ लिटर मोहसडवा, १७ लिटर हातभट्टी, २०.७ लिटर देशी व ४२.४८ लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)