लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वायगाव हळद संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. मात्र, लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने हळदीच्या उत्पादनात यंदा कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.शहरातील प्रामुख्याने भोई समाजातर्फे भद्रावती शहर व परिसरात वायगाव हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या परिसरातील बरीच शेतजमीन उद्योगांसाठी संपादित झाली. शहराचा व्यापही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतीच्या उत्पादनाखाली भूभाग कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच हळद शेतीचे क्षेत्र घटले आहे. कृषी सेवा केंद्रातून हळदीची कोणतीही बिजाई मिळत नाही. उत्पादीत हळदीपैकी बिजाईसाठी आवश्यक असलेली हळद वेगळी काढून ठेवून तिचा एखादा झुडपाखाली थंडावा असलेल्या ठिकाणी खड्ड्यात पुरल्या जाते. त्यानंतर वर्षभर सांभाळून ठेवून ती दुसऱ्या वर्षी बिजाईसाठी वापरावी लागते. या कालावधीत काही हळद नष्ट होवून बिजाई कमी आहे. हळदीची पेरणी जून महिन्यात केली जाते. यासाठी कोणतेही यंत्र उपलब्ध नसल्याने ती केवळ मजुरांकडूनच करावी लागते. त्यामुळे उत्पादनखर्चात सातत्याने वाढ होत आहे.फेबु्रवारी महिन्यात ती खोदुन बाहेर काढण्यासाठी मजुरांची मदत घ्यावी लागते. एवढ्यावरच हळदीचे उत्पादन हातात येत नाही. काढलेल्या हळदीला उकळून वाळवून तिला घासल्यानंतरच हळद विक्रीसाठी तयार होते.या शेवटच्या प्रक्रियेसाठीही उत्पादकांना खूप मोठा खर्च येतो. अशा अवस्थेत बाजारपेठात हळदीचे भाव पडल्यास उत्पादकांना आर्थिक तोटा सहजन करावा लागतो.वायगाव हळदीला विदर्भातच राज्यभरात मागणी आहे. मात्र, या पिकाच्या उत्पादनासाठी येत असलेला प्रचंड खर्च, परिश्रमाच्या तुलनेत मिळणारा लाभ फारसा नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात अधिग्रहित झाल्या आहेत. त्यामुळे लागवड क्षेत्राची व्याप्ती कमी झाली. हळद पिकाच्या उत्पादनात यंदाही मोठी घट होण्याची स्थिती आहे.- भारत नागपुरे, हळद उत्पादक शेतकरी
वायगाव हळद पिकाचे यंदा उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 5:00 AM
शहरातील प्रामुख्याने भोई समाजातर्फे भद्रावती शहर व परिसरात वायगाव हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या परिसरातील बरीच शेतजमीन उद्योगांसाठी संपादित झाली. शहराचा व्यापही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतीच्या उत्पादनाखाली भूभाग कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच हळद शेतीचे क्षेत्र घटले आहे. कृषी सेवा केंद्रातून हळदीची कोणतीही बिजाई मिळत नाही.
ठळक मुद्देलागवड क्षेत्र घटले : शेतीची जमीन उद्योगांसाठी संपादित