चंद्रपूर : कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. आता सकाळी ७ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत बाजार सुरू राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मागील दोन महिन्यातील नुकसान यामुळे भरून निघेल, असा विश्वास व्यावासयिकांनी व्यक्त केला जात आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. परिणामी राज्य शासनाने लाॅकडाऊन केले. कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद होते. दरम्यान, जून महिन्यामध्ये रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शिथिलता देत बाजारपेठेसह, शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांमध्येही आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता सोमवारपासून पुन्हा या वेळेत दोन तासांनी वाढ करून बाजारपेठ सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, वेळ वाढवून देण्यात आल्यामुळे बाजारातील गर्दी कमी होईल परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट
जिल्हा प्रशासनाने बाजाराची वेळ दोन तासांनी वाढवून दिल्यामुळे सर्वांनाच फायदा होणार आहे. यामुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण येईल तसेच नागरिकांनाही सोयीचे होईल.
-सदानंद खत्री
व्यापारी, चंद्रपूर