शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

व्यावसायिकांनी कोरोना तपासणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दैनंदिन व्यवसायाच्या निमित्ताने दररोजच विविध नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यावसायिकांनी तातडीने त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : व्यापारी संघटनांची संयुक्त बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दैनंदिन व्यवसायाच्या निमित्ताने दररोजच विविध नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यावसायिकांनी तातडीने त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या समवेत काल नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकरी राहुल कर्डिले यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, बहुतांश व्यावसायिक सुपरस्प्रेडर गटात मोडतात, त्यामुळे त्यांनी स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी. तपासणीमुळे कोरोना आजाराचे लवकर निदान झाल्यास संभाव्य धोका टाळता येईल व फैलाव रोखता येईल, त्यामुळे व्यावसायानिमित्त बाहेर राहणाऱ्या लोकांनी कोरोनाची तपासणी तातडीने करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कोव्हीड-१९ च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, व्यवसायातील सर्व सहकारी, कर्मचारी, कामगारांची कोविड तपासणी करावी, तसेच नियमांचे पालण करण्याबाबत उद्योगातील आस्थापनांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील व्यावसायिकांनी कोरोना लसीकरण करून स्वत:ला सुरक्षीत करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, चेंबर ऑफ कामर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, रामजीवन परमार, सुमेध कोतपल्लीवार, प्रभाकर मंत्री, नारायण तोशनीवाल, दिनेश बजाज, आवळे, टहिल्यानी, एमआयडीसीचे मधुसूदन रुंगठा, प्रवीण जाणी आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी