शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

परराज्यांतून आलेल्यांना प्रतिबंध घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:33 AM

प्रसाधनगृह नसल्याने नागरिकांची गैरसोय भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अपर तालुक्याचे ठिकाण आहे; परंतु शहरात ...

प्रसाधनगृह नसल्याने नागरिकांची गैरसोय

भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अपर तालुक्याचे ठिकाण आहे; परंतु शहरात अनेक ठिकाणी प्रसाधनगृहेच नसल्याने व्यापारीवर्गाची व नागरिकांची गैरसोय होत आहे. बाहेरगावातील नागरिकांना खुल्या जागेवरच लघुशंकेसाठी जावे लागते. भिसीत शनिवारी बाजार भरतो. बाजारासाठी १५-२० गावांतून नागरिक भिसीला येतात. बाजार चौकात कुठेच प्रसाधनगृह नसल्याने बाहेरील नागरिकांची मोठी गैरसोय होते. जिथे जागा मिळेल तिथे लघुशंका आटोपली जाते. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.

सॅनिटायझरची विक्री घटली

चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. अनेकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे सॅनिटायझरची ६० टक्के विक्री घटली असल्याची माहिती आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा

भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.

पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जडवाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला; परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

जिवती : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही.

दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून, अधिकारी व कर्मचारीही नाहीत.

नद्यांच्या नावाची फलके लावावीत

चंद्रपूर : जिल्ह्यातील इरई, झरपट, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा, शिरणा आदी नद्या वाहतात; परंतु या नद्यांवर नद्यांच्या नावाचे फलक नसल्याने जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नदीच्या नावाबाबत अनभिज्ञता असते. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे.

वडगावच्या नाल्या केव्हा वाहत्या होणार

चंद्रपूर : शहरालगतचे वडगाव हे गाव आता महनागरपालिकेत समाविष्ट आहे. या गावातील नाल्या मात्र वाहत नाहीत. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.