लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कर्नाटकातील जेष्ठ पत्रकार, विचारवंत, विद्रोही साहित्यिक लेखिका गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथे अत्यंत निर्दयीपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या मारेकºयांना पकडून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.गौरी लंकेश या घरी असताना काही अज्ञात इसमांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. गौरी लंकेश या आरएसएस व कट्टर हिंदूत्ववादी यांच्या विरोधात परखड लिखाण करीत होत्या. त्यामुळे देशातील तथाकथित धर्मवादी व्यवस्थेला अडचणी निर्माण झाल्या. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आहे.यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. पानसरे, डॉ. कुलबर्गी व त्यानंतर गौरी लंकेश यांची हत्या म्हणजे देशामध्ये दहशत व अराजकता माजविण्याचा प्रयत्न आहे. या चारही हत्या एकाच पद्धतीने केलेल्या आहेत. परंतु, अजूनही त्या मारेकºयांना पकडण्यात आहे नाही. त्यांना तत्काळ पकडून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी भारीपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महासचिव धिरज बांबोडे, जेष्ठ नेते बंड ठेंगरे, रमेश ढेंगरे, सुमीत मेश्राम, लता साव, राजू कीर्तक, रूपचंद निमगडे, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, तनुजा रायपूरे, दमयंती नवनाथ आदी उपस्थित होते.ब्रह्मपुरीत संभाजी ब्रिगेडतर्फे निषेधब्रह्मपुरी : कर्नाटक राज्यातील सत्यशोधक निर्भीड जेष्ठ पत्रकार व लेखिका गौरी लंकेश यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येचा आणि भ्याड हल्याचा संभाजी ब्रिगेड तालुका ब्रह्मपुरीच्यावतीने निषेध व्यक्त करून गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना शोधून मारेकºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशार संभाजी ब्रिगेड तालुका ब्रह्मपुरीच्या वतीने पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) महेश पिल्लारे, तालुकाध्यक्ष जगदिश पिल्लारे, शहर अध्यक्ष अतुल राऊत, गोवर्धन दोनाडकर, प्रा.चंदन नगराळे, विशाल राऊत, प्रा.अंकुश मातेरे, नंदेश्वर कोसरे, राकेश शेंडे, शुभम पत्रे, कमरअली, सलीम ऊ्यकर, रमाकांत बगमारे, धनू नाकतोडे, पियुष गेडाम, होमराज नाकतोडे, बालू पिलारे, संतोष पिल्लारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा भारिपतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:43 PM
कर्नाटकातील जेष्ठ पत्रकार, विचारवंत, विद्रोही साहित्यिक लेखिका गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथे अत्यंत निर्दयीपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : मारेकºयांना अटक करा