लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलिने अधिग्रहित केलेल्या जमिनीला योग्य दर मिळावा, याकरिता अकरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यांनी आपली दिवाळी उपोषण मंडपातच साजरी केली.वेकोलिच्या पौनी ३ च्या प्रकल्पग्रस्तांनी १० आॅक्टोबरपासून पौनी २ ओपनकास्ट बंद पाडून जमिनीला योग्य दर मिळावा. तसेच इतर मागण्यांकरिता उपोषण सुरु केले होते. ११ दिवस लोटूनही कोणताही तोडगा निघाला नाही. प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी उपोषण तीव्र करुन मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली. त्यात राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे अनिल ठाकूरवार तर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर, नितीन पिपरे यासह अनेकांचा समावेश होता. परंतु अजूनही यावर ठोस निर्णय होऊ शकला नाही. आंदोलन शांततेत सुरु आहे.या प्रकल्पग्रस्तांनी आपली दिवाळी उपोषण मंडपातच साजरी केली. त्यात लक्ष्मी पूजन, गायगोदन यासारख्या विधी पार पाडले. त्यांना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता आली नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळीसारख्या सणाला ते घरी नाहीत, याची त्यांना खंत आहे. मात्र उपोषणाचा निर्धारही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. वेकोलिच्या अधिकाºयांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्र उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.याप्रसंगी साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच अमोल घटे, विजय कारवले, धर्मराज उरकुडे, खुशाब पोडे, शेषराव बोंडे, उत्तम बोबडे, चंद्रकांत लेडांगे, मंगेश उरकुडे, राकेश उरकुडे, प्रमोद निमकर, ज्ञानेश्वर येरगुडे, मारोती उरकुडे यासह साखरी, वरोरा, पौनी येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.वेकोलि प्रशासनाच्या कृपेने आमची दिवाळी अंधारात गेली असली तरी जोपर्यंत लेखी स्वरूपात आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. त्वरित मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.- अमोल घटे, उपसरपंच, साखरी
प्रकल्पग्रस्तांची दिवाळी उपोषण मंडपातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:30 AM
वेकोलिने अधिग्रहित केलेल्या जमिनीला योग्य दर मिळावा, याकरिता अकरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यांनी आपली दिवाळी उपोषण मंडपातच साजरी केली.
ठळक मुद्देजमिनीला योग्य दर देण्याची मागणी : ११ दिवसांपासून आंदोलन