लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा सोमवारी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण होतपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांसह देशमुख यांना ताब्यात घेतले.सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत महसूल विभागाच्या सचिवांकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. वेळ आल्यास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त व जन विकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला. प्रकल्पग्रस्तांसोबत जन विकासच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर सुध्दा पोलीसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केली. आंदोलनकर्ते जखमी झाल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.कंपनीने विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दरानुसार जमिनीचा मोबदला दिला. तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकºया पण दिल्या. १७ -१८ वर्षांतर प्रकल्पग्रस्त विनाकारण गैरकायदेशिररित्या आंदोलन करून कंपनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.-संजीव राव, कर्मशिअल हेड, मराठा सिमेंट वर्क्स,
अंबुजासमोर प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:09 PM