शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
3
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
4
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
5
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
7
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
8
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
9
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
10
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
11
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
12
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
13
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
14
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
15
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
16
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
17
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
18
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
19
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
20
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

प्रकल्पग्रस्तांनी कोळसा खनन व वाहतूक बंद पाडली

By admin | Published: April 27, 2017 12:49 AM

बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत पीनी २ या कोळसा खाण प्रकल्पातील २२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नोकरी बहाल करावी,...

वेकोलिचे लाखोंचे नुकसान : प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणीचंद्रपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत पीनी २ या कोळसा खाण प्रकल्पातील २२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नोकरी बहाल करावी, पीनी- ३ प्रकल्पाकरिता संपादीत होत असलेली अतिक्रमीत जमिनीच्या अतिक्रमणधारकांना आर्थिक मोबदला तसेच आर आर पॉलीसी नुसार देय लाभ मिळावे या व अन्य मागण्यासाठी २१ एप्रिल रोजी भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री राजू घरोटे यांच्या नेतृत्वात शेकडो प्रकल्पग्रस्तानी पौनी- २ खाणीत कामबंद आंदोलन करुन वेकोलि अधिकाऱ्यांची झोप उडविली. प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावला अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी वेकोलि प्रबंधनास दिला आहे. या आंदोलनामुळे वेकोलिचे फार मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पौनी- २ या कोळसा खान प्रकल्पामध्ये साखरी व पौनी या दोन्ही गावातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या सुमारे ७७६ एकर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या प्रकल्पात एकूण २४२ नोकऱ्या मंजूर असतानाही काही प्रकल्पग्रस्तांना नोकरी देवून २२ प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न वेकोलि अधिकाऱ्यांनी सेक्शन ९ चे कारण सांगत सुडबुधीने केला असल्याचा आरोप शेतकरी नेते राजू घरोटे यांनी केला.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उर्वरीत सर्व प्रकल्पग्रस्तांना तातडीने नोकरीत सामावून घेण्याचे निर्देश दिले असताना तसेच याबाबत वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निर्देशकानी उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेतले जाईल, असे मंत्री महोदयांना आश्वासन देऊनही वेकोलि अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळत असल्याने सुमारे ३०० हून अधिक महिला पुरुष प्रकल्पग्रस्तांनी पौनी खाणीस धडक देत कोळसा उत्खनन व वाहतूक दिवसभरासाठी बंद पाडली.या आंदोलनांमध्ये सुनील वांढरे मारोती उरकुडे, भाजपा महामंत्री अ‍ॅड. प्रशांत घरोटे, मिलन करदोड, सुरेश काटवले, भिवाजी देठे, पंढरी काटवले, मंगेश उरकुडे, शितल नगराळे, आनंदराव करमनकर, श्रीनिवास दुडम, मारोती काटवले यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. वेकोलिने या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)