दिवसेंदिवस घर बांधण्याच्या संकल्पना बदलत आहे. पूर्वी सिनेमात दिसणारे घराला आता मूर्त रुप आले आहे. मजल्यावर मजले चढत आहेत. घराची आकर्षकरित्या सजावटही करण्यात येत आहे. त्याच तोडीचे गेट व दरवाजे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे दुरुनच घर उठून दिसत आहेत. मात्र अशा घर कुलूपबंद करताना पैशाची बचत करण्याच्या दृष्टीने अनेकजण मजबूत व दणकट कुलूप खरेदी करण्याऐवजी सस्ता व हलक्या दर्जाचा कुलूप खरेदी करतात. मात्र याचा याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता असते.
चंद्रपुरातील हार्डवेअरच्या दुकानामध्ये आकर्षक स्वरुपाचे व दणकट, मजबूत असे कुलूप उपलब्ध आहेत. त्यासोबतच मध्यम आकाराचे ३० रुपयांपासून कुलूप उपलब्ध आहेत. बहुतेकजण दणकट व आकर्षक प्रकारचे कुलूप वापरतात. पण काही जण काटकसर करीत हलक्या दर्जाचे कुलूप वापरतात. त्यामुळे चोरट्यांने ते कुलूप तोडणे सहज सोपे होते. त्यामुळे लाखो रुपयांच्या घराच्या सुरक्षिततेसाठी काटकसर करुन केवळ थोडेसे पैसे वाचविण्यासाठी कुलूप लावल्याने अनेकदा चोरी झाल्याचे उघड झाले आहे. तर बहुतेकदा चांगल्या दर्जाचे मजबूत कुलूप असल्याने ते फोडणे शक्य न झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला असल्याचेही सामोर आले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने घराला मजबूत व दणकट असे कुलूप वापरण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे.
बॉक्स
घरफोडीच्या प्रकरणात वाढ
दिवसेंदिवस चंद्रपूर शहरात घरफोडीच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. कुलूपबंद घर आढल्यास चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास कुलूप फोडून आत प्रवेश करुन दागीण व रोकड पडवित असल्याच्या घटना चंद्रपूर शहरा, रामनगर, दुर्गापूर, पडोली पोलीस स्टेशनतंगर्गत उघडकीस आल्या आहे. शहरात पोलिसांची गस्त होते. मात्र तरीसुद्धा चोरटे दिवसभर कुलूपबंद घर हेरुन चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अनेक अल्पवयीन बालकांचा समावेश आहे.