ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़ सतत ३३६ दिवस अविरत श्रमदान केल्याने सर्व प्रवेशद्वार व बुरूजांची स्वच्छता झाली़ सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा पुरातत्त्व विभागाने शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे डॉ़ इजहार हाशमी यांनी दिली़ इको-प्रो संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़यावेळी मंचावर जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, डॉ निखिल दास, इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ़ हाशमी यांनी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानसोबत संरक्षण भिंतीचे काम पुरातत्व विभागाने सुरु असल्याची माहिती देवून मंजूर होणाच्या मार्गावर असल्याचेही सांगितले़ जिल्हाधिकारी सलिल यांनी शहराच्या विकास योजनांची माहिती दिली़इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, किल्ला स्वच्छता दरम्यान नागरिकांचे सहकार्य मिळाले़ शहरातील ऐतिहासिक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वॉक आयोजित करावे़ किल्ल्यास लागून होणारे संरक्षण भिंतीचे बांधकाम आणि आतील भागाचा वापर 'सायकल ट्रेक' म्हणून विकसित करण्याची गरजही त्यांनी नमूद केली़चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याचे स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासुन सुरू करण्यात आले़ या अभियानाला ३३८ दिवस पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले़ गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणि मजबुत किल्ला कसा दूरवस्थेत होता़ स्वच्छतेनंतर कसे बदल झाले, हे समजावून सांगण्यासाठी छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती. यावेळी अशोकसिंह ठाकूर अॅड़ विजय मोगरे, अभय पाचपोर, डॉ जयंत वडतकर, विजय चंदावार, रमेश मूलकलवार, हरीश ससनकर डॉ़ देवईकर, डॉ़ पालीवाल, दीपक जेऊरकर, सदानंद खत्री, प्रा़ सुरेश चोपणे, डॉ़ योगेश दुधपचारे, प्रा़ धोपटे, प्रदीप अड़किने, प्रशांत आर्वे, प्रा. विजय बदखल, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार, संपत चव्हाण, वर्षा खरसाने, मनोहर टहलियानी, अनिल दहगावकार, धनंजय तावड़े, उमाकांत धांडे आदी उपस्थित होते़
ऐतिहासिक सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर- हाशमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:47 AM
गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़ सतत ३३६ दिवस अविरत श्रमदान केल्याने सर्व प्रवेशद्वार व बुरूजांची स्वच्छता झाली़ सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा पुरातत्त्व विभागाने शासनाकडे सादर केला आहे, .....
ठळक मुद्देगोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़