लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चिमूर-वरोरा महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. वरोरा वन परिक्षेत्रांतर्गत सालोरी संरक्षित वन कक्षात काही दिवसांपासून बामडोह नाल्यावर सिमेंट बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. याकरिता संरक्षित वनामधील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली व खोदकामही सुरू केले. वन्यप्राण्यांच्या अधिवासात मोठ्या प्रमाणात यंत्र लावून काम सुरू आहेत. त्या परिसरात मजुरांची वर्दळ वाढल्याने वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने चौकशी सुरू केली आहे.सध्या सर्वत्र रस्ते रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्ता रूंदीकरण करीत असताना नद्या, नाले यामधून रस्ता जात असल्यास त्या नजिक सिमेंट बंधारा बांधण्यात यावा, असे काही नियम आहेत. चिमूर-वरोरा मार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सालोरी कक्ष क्रमांक १४ संरक्षित वन आहे. या वनामधून बामडोह नाला वाहतो. त्या नजिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षित वन आहे. काही महिन्यांपूर्वी या वनानजिकच रोपवन तयार करण्यात आले. या संरक्षित वनात मोठ्या प्रमाणात वन्यजीव प्राण्यांचा वावर असतो. या बामडोह नाल्यावर चिमूर-वरोरा रस्ता रूंदीकरण कंपनीच्या वतीने सिमेंट बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. सिमेंट बंधारा बांधण्यापूर्वी या संरक्षित जंगलातील मोठमोठे खोदकाम वृक्ष तोडून जागाचे सपाटीकरण करण्यात आले. त्यानंतर खोदकाम करणे सुरू आहे. सपाट झालेल्या जागेवर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. मजुरांना राहण्याकरिता झोपड्याही उभारण्यात आल्या आहेत. काम यंत्राच्या सहाय्याने दिवसरात्र सुरू असल्याने वन्यप्राण्यांच्या अधिवास नाहिसा होवून वन्यप्राणी नजिकच्या गावाकडे धाव घेवून एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर कामाला वनविभागाची मंजुरी आहे काय, त्याबाबत माहिती काढली असता रस्ता रूंदीकरण करणारी कंपनी तुर्तास चुप्पी साधण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. संरक्षित वनात एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होऊन कित्येक दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीही प्रशासनाने लक्ष जावू नये, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.या संदर्भात कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर एस.जे. बगडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.वृक्ष तोडून परस्पर विल्हेवाटसंरक्षित वनात कुठलेही काम करावयाचे असल्यास वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर तोडलेल्या वृक्षाची किंमत ठरवून त्याचा लिलाव करून रक्कम वनविभागाकडे जमा करण्यात येते. परंतु संरक्षित वनातील किती वृक्ष तोडले व कुठे ठेवले या थांगपत्ता नसल्याने तोडलेल्या वृक्षाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे मानले जात आहे. यासोबत खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात रेती निघाली, ती रेतीही नाहिसी झाल्याचे दिसून येत आहे.
बंधाऱ्यासाठी संरक्षित वनाची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:00 AM
सध्या सर्वत्र रस्ते रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्ता रूंदीकरण करीत असताना नद्या, नाले यामधून रस्ता जात असल्यास त्या नजिक सिमेंट बंधारा बांधण्यात यावा, असे काही नियम आहेत. चिमूर-वरोरा मार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सालोरी कक्ष क्रमांक १४ संरक्षित वन आहे. या वनामधून बामडोह नाला वाहतो.
ठळक मुद्देवनविभागकडून चौकशी सुरू : वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका