मुख्यमंत्र्यांना निवेदन : आरोपींवर कठोर कारवाईची मागणीचंद्रपूर : मुंबई दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि त्यांनी निर्माण केलेली बुद्धभूषण प्रिटिंग प्रेसची वास्तु पाडण्याच्या घटनेचा निषेध करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापासून झाली. मोर्चात सर्व आंबेडकरी समाज, संघटना, गट सहभागी झाले होते. शहरात सकाळपासून संततधार पाऊस सुरु होता. तरीही छत्री व रोनकोटच्या सहाय्याने आंबेडकरी जनता या मोर्चात नारेबाजी करत सहभागी झाली होती. डॉ. आंबेडकरांनी काढलेल्या चार वृतपत्रांपैकी तीन वृतपत्रांची छपाई बुद्धभूषण प्रिटिंग प्रेसमधून केली होती. त्यामुळे या प्रिटिंग प्रेस तसेच आंबेडकर भवनाशी बौद्ध जनतेची मने जुळलेली होती. परंतु रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या भाडोत्री गुडांनी डॉ. आंबेडकर भवन व प्रिटिंग प्रेसची इमारत उद्धवस्त केल्याने आंबेडकरी जनसमुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या रत्नाकर गायकवाड व त्यांच्या ५०० ते ६०० भाडोत्री गुडांना अटक करण्यात आली. अशी मागणी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण खोब्रागडे, पी.व्ही.मेश्राम, तथागत पेटकर, अशोक निमगडे, कोमल खोब्रागडे, सुरेश नारनवरे, विशालचंद्र अलोणे, बंडू नगराळे, देशक खोब्रागडे आदी आंबेडकर अनुयायांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनरत्नाकर गायकवाड व त्याच्या ५०० ते ६०० भाडोत्री गुड्यांना अटक करावी, दादर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस अधिक्षक यांना निलंबीत करावे, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणुन सदर घटनेची जबाबदारी घ्यावी, व पदाचा राजीनामा द्यावा, रत्नाकर गायकवाड व त्यांच्या ५०० ते ६०० भाडोत्री गुड्यांवर मोका लावण्यात यावा, अशा मागण्याचे निवदेन डॉ. आंबेडकर बचाव कृती समितीने जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.