घुग्घुस : केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती चांगल्याच वाढविल्या आहेत. यामुळे सर्वसाधारण नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दरवाढीच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी घुग्घुस शहर कॉंग्रेसच्या वतीने येथील डॉ. आंबेडकर स्मारकापासून (पोळा मैदान) बैलबंडीवर कार आणि मोटरसायकल ठेवून आणि सोबत सायकल घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला.
घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये युवा नेते सुरज कन्नूर, शेखर तंगडपल्ली, कल्याण सोदारी, लखन हिकरे, सुरज बहुराशी, देव भंडारी, प्रफुल हिकरे, जावेद कुरेशी, अनिरुद्ध आवळे, विशाल मादर, रोशन दंतालवर, बालकिशन कुळसंगे, साहिल सैय्यद, रंजिता आगदारी, अलका पचारे, पद्मा रेड्डी, संगीता बोबडे, विजया बंडीवार, गीता सोदारी, यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
बॉक्स
जाहिरातीच्या फोटोवर काळे फासल्याने तणाव
या मोर्चादरम्यान कॉंग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यानी बसस्थानक ते राजीव रतन चौक रस्त्यावरील एका पेट्रोलपंपवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवरील फोटोला काळे फासल्याने तणाव निर्माण झाला. दोषींना त्वरित अटक करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी पेट्रोलपंप मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार युवक काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सूरज कन्नूर, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तौफिक शेख, निखील पुनगंटी यांच्याविरुद्ध ५००, ४२७, ४४७ (३४) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.