टाळेबंदी काळात केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोलसह घरगुती गॅसचीही भाववाढ केली. हाती रोजगार उपलब्ध नसताना दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांना आता महागाईच्या भस्मासुराने जीवन जगणे अवघड केले आहे. अशा बिकट परिस्थितीतही केंद्र शासनाने आपल्या अडेलतट्टू धोरणावर तटस्थ राहून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ केल्याने याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करत महिला क्रांती संघटनेच्या वतीने स्थानिक पेट्रोल पंपावर निदर्शने करून भाववाढीचा तीव्र निषेध नोंदविला. व महागाई कमी करण्यासंदर्भात गोंडपिपरीचे तहसीलदार के.डी. मेश्राम यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सदस्य तथा महिला संघटनेच्या रेखा रामटेके, दर्शना एकनाथ दुर्गे, वनिता वाघाडे व संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
100621\img-20210607-wa0026.jpg
===Caption===
गोंडपिपरी तहसीलदारांना निवेदन सादर करताना क्रांती महिला संघटनेच्या पदाधिकारी