लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डॉक्टर्स व आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर्स व त्यांच्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार आरोग्य विषयक साहित्य व त्यांच्या सुरक्षेकरिता असलेले साहित्य (पीपीई किट्स, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज इ.) तसेच रुग्णासाठी व्हेंटीलेटर्स व औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे हे सर्व साहित्य शासनाने त्वरित पुरवावे, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे.जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या उद्योगाने सीएसआर या फंडातून २००० ते ३००० किट्स (गहू, तांदूळ, दाळ, तेल आदी) एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे साहित्य तातडीने दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हजारो किट्सचे वाटप करण्यात आले व करण्यात येत आहे. गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत ते किट्स पोहोचत असावेत. परंतु उद्योगाने आपल्या उद्योगाच्या सभोवतालच्या परिसरातील जी गावे दत्तक घेतली आहेत, त्या गावातील सरपंचानी विनंती केल्यानंतरसुद्धा त्या भागातील गोर-गरीबांना धान्याचे किट्स न दिल्यामुळे जनतेत रोष आहे. त्या लोकांनासुद्धा त्या भागातील उद्योगाने धान्याचे व इतर साहित्याचे किट्स वाटप करावे, अशी मागणीही पुगलिया यांनी केली आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना व एनजीओ तसेच व्यक्तीशा मदत करणाऱ्या दानशुरांतर्फे भोजन वितरणाचे काम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरु आहे. कोरोनासारख्या आजाराचा सामना करताना कोणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी जिल्ह्यातील दानशूर जनता आपापल्या भागात घेत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आरोग्य विषयक साहित्य पुरेशा प्रमाणात पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 5:00 AM
जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या उद्योगाने सीएसआर या फंडातून २००० ते ३००० किट्स (गहू, तांदूळ, दाळ, तेल आदी) एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे साहित्य तातडीने दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हजारो किट्सचे वाटप करण्यात आले व करण्यात येत आहे. गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत ते किट्स पोहोचत असावेत.
ठळक मुद्देनरेश पुगलिया यांची मागणी : सेवाभावी संस्थांचे केले कौतुक