आॅनलाईन लोकमतपोंभुर्णा : छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान नंदकुमार देवाजी आत्राम हे शहीद झाले. त्यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्या वतीने अडीच लाखांची आर्थिक मदत आई ताराबाई व वडील देवाजी आत्राम यांना बोर्डा येथे जावून धनादेश सुपूर्द करण्यात आली.सदर धनादेश नाम फाऊंडेशनचे विदर्भ संघटक हरिश इथापे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय वैद्य यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी नाम फाऊंडेशनचे विक्रम खडसे, बोर्डाचे माजी सरपंच अनिल ठावरी, विजय दुधलकर, देवानंद साखरकर, प्रशांत नैताम तथा ग्रामस्थ उपस्थित होते. नामतर्फे शहीदांच्या कुटुंबीयांना ही अल्पशी आर्थिक मदत असल्याची माहिती विदर्भ संघटक हरिश इथापे यांनी दिली.देवाजी आत्राम यांनी मुलाच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. ११ मार्च रोजी शहीद नंदकुमार आत्राम यांचा पहिला स्मृतीदिन असून स्मृतीदिनानिमित्त बोर्डा गावात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात शहीद नंदकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद स्मारक तयार करण्यात आले असून या स्मारकाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ११ मार्च रोजी होणार आहे.
शहिदाच्या कुटुंबाला अडीच लाखांचा धनादेश प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:24 PM
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान नंदकुमार देवाजी आत्राम हे शहीद झाले. त्यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्या वतीने अडीच लाखांची आर्थिक मदत आई ताराबाई व वडील देवाजी आत्राम यांना बोर्डा येथे जावून धनादेश सुपूर्द करण्यात आली.
ठळक मुद्देनाम फाऊंडेशन : रविवारी स्मृतीदिन कार्यक्रम