आॅनलाईन लोकमतब्रम्हपुरी: यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. शिवाय, राज्यात ७ व्यक्तिंचा मृत्यू झाला. राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणी विधीमंडळाचे उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे..विदर्भातील तूर, गहू, हरभरा, लाखोळी, ज्वारी, उडिद, मूग, संत्रा या पिकांसह अनेक पिके काढणीला आली आहेत. मात्र, अवकाळी पावसामूळे भुईसपाट झाले आहे. पाऊस व गारपिटीमूळे पिकांचे नकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकºयांना हेक्टरी सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर संकट आले. त्यातच किडी रोगांच्या प्रकोपाने खरीप हगांमातील नष्ट झालेले पिकामुळे शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बी हंगामास सुरवात केली. परंतु, निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. विदर्भात तूर, गहू, हरभरा, लाखोळी, उडिद, मूग, ज्वारी, संत्रा, भाजीपाला आदी पिकांसह विविध पिकांची लागवड केली. पिके काढणीला आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून विदर्भासह राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली वादळी वाºयासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. पावसाच्या तडाख्यात तूर, हरभरा, गहू, लाखोळी, मूग, ज्वारी,संत्रा, भाजीपाला ही पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास वाया गेला. आंब्याचाही फुलोराही गळून पडला. खरीप आणि रब्बी पिकांच्या प्रंचड नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आर्थिक संकटात सापडला. शेतकºयांना आधार देण्यासाठी अवकाळी पाऊस व गारपीटीमूळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करावे. महसूल विभागाने विशेष पथक तयार करून राज्यातील सर्व जिल्ह्यांची पाहणी करावी, अशी मागणी आमदार वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
पिकांचे सर्वेक्षण करून तातडीने आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:30 PM
यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : कृषिमंत्र्यांना पाठविले निवेदन