यावेळी खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रशांत मडावी सहभागी झाले होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, पेरणीनंतर पावसाचा खंड, जोराचा पाऊस, बियाण्यांची उगवणक्षमता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत दुबार पेरणी करावयाची झाल्यास दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे. बियाण्याची उगवण क्षमता तपासणीसाठी कृषी विभागाने बीजप्रक्रिया मोहीम राबवावी. शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड पद्धतीमध्ये बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाचा वापर करावा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लोकप्रतिनिधींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या
लोकप्रतिनिधींनी कृषी समस्या, आवश्यक खत, बियाण्यांची उपलब्धता, वीज पुरवठा व शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी मांडल्या. हळद लागवडीसाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत क्लस्टर स्तरावर लागवडीचे प्रयत्न मागील वर्षी केले. यंदाही हीच पद्धत वापरण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी खरीप हंगाम नियोजनाची माहिती सादर केली.