लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रामध्ये उत्तम सुविधा पोलीसांना मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील पोलीसांच्या निवासाची शंभर टक्के सुविधा उपलब्ध करण्याकडे आपला कल आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक दजेर्दार सुविधा जिल्ह्यातील पोलीसांना दिल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.दूर्गापूर येथील पोलीस स्टेशन व प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार अनिल सोले, महापौर अंजलीताई घोटेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मलिकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा परिषद सदस्या रश्मी खान, वनिता आसडकर उपस्थित होते.दूगार्पूर पोलीस स्टेशनची इमारत पोलीस ठाण्याची वाटणार नाही, अशी सुरेख रचना करण्यात आली आहे. पोलीस विभागातील सुधारणांबाबत चंद्रपूर अग्रेसर राहावे, ही आपली कायम इच्छा आहे. मुंबई येथील उच्चपदस्थ अधिकारी देखील चंद्रपूरमध्ये उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या व्यायाम शाळेची ग्वाही देतात. राज्यामध्ये पोलीस निवासात सर्वाधिक घरे चंद्रपूरमध्ये बांधण्यात येत आहेत. निवृत्त झालेल्या पोलीसांना देखील विविध आवास योजनेतून घरे देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीसांच्या कामातही त्याच पध्दतीचा दर्जा व परिणामकारकता दिसायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.संचालन सायबरसेलचे पोलीस निरीक्षक विकास मुंडे, आभार दूगार्पूर ठाणेदार एच.एम. यादव यांनी मानले.
चंद्रपूर पोलिसांना दर्जेदार सुविधा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:45 AM
महाराष्ट्रामध्ये उत्तम सुविधा पोलीसांना मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील पोलीसांच्या निवासाची शंभर टक्के सुविधा उपलब्ध करण्याकडे आपला कल आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक दजेर्दार सुविधा जिल्ह्यातील पोलीसांना दिल्या जातील, ....
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : दूर्गापूर पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण