यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, बालरोग तज्ज्ञ डॉ. एम.जे. खान, भाजप महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वांना बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत औषधोपचार मिळावा, सर्वांचे आरोग्य अबाधित राहावे या अपेक्षेतून अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर निर्माण करण्यात आले. कोरोनासंबंधी उपयुक्त रेमडेसिविर, फॅविपीराल, व्हिटॅमिन ए टू झेड, आयव्ही, अँटिबायोटिक्स, सर्जिकल वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी अहिर यांनी संबंधितांची चांगलीच कानउघडणी केली. चंद्रपूर शासकीय विद्यालय अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आठवड्यातून एकदा या मेडिकल स्टोअरच्या साठ्याचा आढावा घ्यावा, असे यावेळी अहिर यांनी सुचविले. औषधांच्या उपलब्धतेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी तसेच राज्य सरकारशी संपर्क साधून या मेडिकल स्टोअरच्या गलथान कारभाराची तक्रार करून एचएलएलला त्वरित उपयुक्त औषध साठा उपलब्ध करण्यासाठी विनंती करणार असल्याची ग्वाही यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली. एचएलएलच्या या हलगर्जी धोरणामुळे रक्त तपासणीच्या कराराचा पुनर्विचार करावा, असेही यावेळी अहिर यांनी सांगितले.
अमृत मेडिकलमध्ये रेमडेसिविर औषध उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:26 AM