विद्यार्थ्यांचीही उपस्थिती : वृक्ष संवर्धन व स्वच्छतेवर जागृतीचंद्रपूर : इनरव्हील क्लब आॅफ स्मार्ट सिटी चंद्रपूरद्वारा इनरव्हील डे निमित्त मंगळवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे काही काळ चंद्रपूर नगर दुमदूमले. गांधी चौक येथे शोभाताई पोटदुखे व डॉ. पे्ररणा कोलते यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. इनरव्हील क्लब आॅफ स्मार्ट सीटीच्या अध्यक्षा शंकुतला गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन शोभातार्इंचे स्वागत केले. फाऊन्डर प्रेसिडंट डॉ.विद्या बांगडे यांनी डॉ. प्रेरणा कोलते यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.रॅलीमध्ये इनरव्हील क्लब आॅफ स्मार्ट सिटीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. तसेच किदवाई हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नारी शक्तीवर आधारित सर्व तेजस्वी महिलांचे रुप देखाव्याद्वारे सादर केले. तर मातोश्री विद्यालयातील १०० विद्यार्थिनींच्या चमूने सादर केलेले सुंदर लेझीम लोकांचे आकर्षण ठरले. साक्षरता अभियान, वृक्ष संवर्धन, स्वच्छता मोहिम, बेटी बचाव व बेटी पढाव, स्त्री शक्ती प्रदर्शन व सर्वधर्मसमभावच्या झाकीतील दृष्यांनी चंद्रपूर शहरातील लोकांची मने जिंकली. इनरव्हीलने राबविलेल्या सर्व प्रकल्पांचे बॅनर संपूर्ण रॅलीत लावण्यात आली होती. त्यामुळे इनरव्हीलच्या कार्यावर प्रकाश पडला. संस्थेने राबविलेले आरोग्य शिबिर, स्वसंरक्षणाचे ट्रेनिंग कॅम्प, विधी साक्षरता, पालक पाल्यांसाठी समुपदेशन, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, समाजाचा कणा व विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक यांचा सत्कार नेशन बिल्डर अॅवार्ड देवून करणे, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांसाठी वादविवाद, वकृत्व स्पर्धा, चित्र स्पर्धा तर गरिबांना ब्लॅकेट वाटप, वृद्धाश्रमात कार्यक्रम, यासारखे विविध उपक्रमाचे बॅनर रॅलीत लावण्यात आले होते. चेअरमन जुलेखा शुक्ला यांनी ठरविलेल्या अभिनव डिस्ट्रक्ट प्रकल्पांचे क्लबने दखल घेवून केलेल्या सुंदर उपक्रमाबद्दलची जाणीव रॅलीद्वारा समाजाला झाली. त्यानंतर जटपूरा गेट येथे हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरचे प्रसिद्ध पॅथोलाजीस्ट डॉ. प्रमोद बांगडे व त्यांच्या चमूने सर्व विद्यार्थ्यानी व इनरव्हील सदस्यांचे हिमोग्लोबीन तपासले व डॉ.शर्मीली पोदार यांनी विद्यार्थिनींना चांगल्या व योग्य आहाराची या वयात किती आवश्यकता आहे, हे आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले.रॅलीच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शकुंतला गोयल, फाऊंडर प्रेसिटेंड डॉ. विद्या बांगडे फाऊंडर सचिव शाहीन शफीक, भारती गुंदेचा, पुनम कपूर, सुनिता जयस्वाल, छबू वैरागडे, पोर्णिमा बावणे, रमा गर्ग, राणी भाटीया, संगीता त्रिवेदी, माया त्रिवेदी, अश्लेषा गुमडेलवार, शर्मिली पोद्दार, मोना खजांची, किरण डावरा, यांनी परिश्रम घेतले.बेटी बचाव बेटी पढाव, प्रदूषण, पर्यावरण, साक्षरता, भ्रृणहत्या, विजेची बचत, इंधन बचत, जलसंर्धन व इतर विषयावरील स्लोगनने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.(शहर प्रतिनिधी)
विविध विषयांवर जनजागृती रॅली
By admin | Published: January 12, 2017 12:39 AM